चालू वांद्रे – एक अनुभव

₹500

वांद्रे म्हणजे मुंबई महानगराच्या संमिश्र आणि विविधतेने नटलेल्या संस्कृतीचं उत्तम प्रातिनिधिक उदाहरण. “चालू वांद्रे – एक अनुभव” म्हणजे वांद्र्यात राहणार्‍या स्थानिक अभ्यासकासोबत रमतगमत या परिसरातील वर्तमान व इतिहासात बागडण्याची नामी संधी; तसेच वांद्र्यातील टुमदार, हिरव्यागार, सुमसान व शानदार अश्या गल्लीबोळांमध्ये डोकावण्याची संधी.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

दिनांक: शनिवार, १३ जानेवारी २०१८
वेळ: सकाळी ८ वाजता ते १० वाजता


Category


Share

चालू वांद्रे – एक अनुभव

या वाॅल्क मध्ये वांद्र्यातील जुन्या वास्तू, शाबूत राहिलेली गावठाण, पोर्तुगीजांनी सुरु केलेले चारशे पर्षांपूर्वीचे चर्च, येथील ख्रिश्चन वस्ती, येथील गल्ल्यांतील सुंदर भित्तिचित्रे, अतिशय जुने व आकर्षक टुमदार बंगले व त्यांच्या वैविध्यपूर्ण वास्तुरचना, मुंबई व वांद्र्याच्या स्थानिक इतिहासातील महत्त्वाच्या पाऊलखुणा, याची देही याची डोळा अनुभवता येतील.

अतिरिक्त माहिती

समावेश – नकाशा      नेटिव्ह फी

मार्गदर्शक सूचना – 

नियोजित मार्ग सुमारे नव्वद मिनीटे व ३ किलोमीटरचा आहे. बूट घातल्यास उत्तम. फिट आणि फ्रेश या.
भेटण्याच्या जागेवर (मीटिंग पॉईंट) अगदी वेळेवर पोहोचा. भेटण्याच्या जागेवर कसे पोहचाल यासंदर्भात मदत मिळेल.
बुकिंग झाल्यावर भेटण्याची जागा व अन्य माहिती सांगण्यात येईल.

नेटिव्ह ऋतू विषयी

Native profile अतिशय ‘चालू’, (म्हणजे चालण्याची आवड) असल्याने वांद्र्याच्या या गल्लीबोळांत नेटिव्ह ऋतूचा सदैव वावर असतो. मुंबईच्याच सेंट झेविअर्स महाविद्यालयातील माजी विद्यार्थी व पुरातन भारतीय संस्कृती विषयातील अभ्यासक. याशिवाय स्थानिक संस्कृती, वारसा, इतिहासाच्या अभ्यास व आवडीमुळे ‘चालू वांद्रे’ ची सुरुवात झाली. पदव्युत्तर बुद्धिस्ट स्टडीज् या विषयांत सहाय्यक प्राध्यापकपद सांभाळले. ऋतू हा भारतीय अभिजात संगीत अभ्यासक व शास्त्रीय गायक कलाकार असल्याने ‘चालू वांद्रे’ लयदार व सुरेल होते.

येथे ऋतू बद्दल आणखी वाचा.

नेटिव्हला विचारा

रद्दीकरण

नोंदणी केल्यावर, बुकिंगच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत अनुभवाची तारीख निश्चित करणे आवश्यक आहे.
फोन किंवा ईमेलद्वारे आमच्याशी संपर्क साधून बुकिंगच्या तारखेपासून २ दिवसांच्या आत अनुभव रद्द केला जाऊ शकतो.
रिफंड संबंधित बँक खात्यात १५-२० कामाच्या दिवसांमध्ये प्रक्रिया केली जाईल.
परतावा रक्कम = एकूण बुकिंग मूल्य – पेमेंट गेटवे फी
अधिक माहितीसाठी सर्व नियम व अटी वाचा

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चालू वांद्रे – एक अनुभव”